बीड: बीड (Beed) जिल्ह्यात एका २४ वर्षीय विवाहितेवर बलात्कार (Sexual Assault) केल्याची संताजपनक घटना समोर आली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या विवाहितेवर (Married Women) सतत तीन वर्षे बलात्कार केला. आरोपीने विवाहितेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे भीतीपोटी तिने ३ वर्ष सतत अत्याचार सहन केले. बलात्कार पीडित विवाहित महिला आणि आरोपी हे दोघेही उसतोड कामगार आहेत आणि दोघेही एकाच कारखान्याला उसतोडणीचं काम करतात. (sexual assault on 24 years old married women in beed crime-filled in sirsala police station)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, चरण लक्ष्मण पौळ वय 32 रा. मोहा तालुका परळी असे आरोपी ऊसतोड मजुराचे नाव आहे. "तुझ्या पतीला जीवे मारुन टाकीन', असं धमकावत २४ वर्षीय विवाहितेवर सतत ३ वर्षांपासून बलात्कार करण्यात आला. ही धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यातील मोहा गावात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी आणि पीडिता हे दोघेही ऊसतोड कामगार आहेत.
आरोपी आणि पीडित हे एकाच कारखान्याला ऊस तोडणीसाठी जात होते. या दरम्यान त्यांची ओळख झाली होती आणि आरोपीने पीडितेला धमकावले. या प्रकरणी बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यांमध्ये आरोपी चरण पौळ याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.