School First Day: स्कूल चले हम! दप्तर, पाटी अन् चिमुकल्यांची लगबग, आज शाळेची पहिली घंटा वाजणार

Students Textbooks Will Be Given Academic Year 2024-25: उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. आजपासून शाळा सुरू होत आहे.
शाळेचा पहिला दिवस
School First DayYandex

राज्यातील शाळा आज १५ जूनपासून सुरू होत आहे. शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग हा उपक्रम राबवत आहे. यानिमित्ताने आज सर्वच ठिकाणी शाळांमध्ये मुलांचे स्वागत केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शासनाकडून देण्यात येणार आहे.

शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सजावट करण्यात आल्याचं अनेक ठिकाणी दिसत आहे. अनेक विद्यार्थी आज पहिल्यांदाच शाळेत जाणार (School First Day) आहे. त्यामुळे विद्यार्थी अन् पालक या दोघांच्याही मनात थोडीशी धाकधुक जाणवत आहे. मुलांचं स्वागत करताना चाफ्याचे फुल आणि साहित्याचे कीट यांचंही वाटप करण्यात येत आहे. वरळीतील मराठा हायस्कूलमधून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत केलं ( Academic Year 2024-25) जाणार आहे.

हा शैक्षणिक पाडवा सरकारचा स्टार्स उपक्रम आणि समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यामधील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये साजरा केला जाणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांमध्ये (School Open Today) केली गेली आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळीच्या पायघड्या घालून होणार आहे. पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, खाऊ विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. शिक्षण विभागातील स्थानिक अधिकारी देखील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत उपस्थित राहणार आहेत.

शाळेचा पहिला दिवस
Student Viral Video: जिंकलस मित्रा! शाळकरी मुलगा चक्क धावत्या स्कूटीवर करतोय अभ्यास;VIDEO VIRAL

शाळेचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठं उत्साहाचं वातावरण आहे. मे महीन्याच्या सुट्टीमुळे शांत असलेला शाळेचा परिसर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने भरून जाणार (Student) आहे. शाळेच्या पटांगणामध्ये विद्यार्थांची लगबग आजपासून दिसणार आहे. शाळेंमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांचं मोठं थाटामाटात स्वागत होताना दिसत आहे. नवी पुस्तके अन् नवे दप्तर घेऊन लहान मुलेही शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

शाळेचा पहिला दिवस
Neet Student Protest : नीट परीक्षा रद्द करा; राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक, ठिकठिकाणी आंदोलन आणि निदर्शने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com