Satyajeet Tambe Tweet: "उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी", सत्यजित तांबेंच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय?

Satyajeet Tambe News: एकीकडे बाळासाहेब थोरात हे तांबेंचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्नशील असताना सत्यजित तांबेंनी हे ट्वीट केले आहे.
Satyajit Tambe's Indicative tweet,
Satyajit Tambe's Indicative tweet,SAAM TV

Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांनी "उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी" असे सूचक ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात खांद्याला दुखापत झाल्यापासून दीड महिन्यानंतर संगमनेरमध्ये परतले आहेत. सोमवारी थोरात यांनी सत्यजित तांबे यांचे काँग्रेस पक्षाने केलेले निलंबन मागे घेण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते. (Latest Marathi News)

Satyajit Tambe's Indicative tweet,
Maharashtra School: राज्यातील शाळांचं पूर्ण स्वरूप बदलणार! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

"सत्यजीतची टीम काँग्रेसमध्ये आणि तो एका बाजूला आहे. मात्र सत्यजित काँग्रेसला तुझ्या शिवाय आणि तुलाही काँग्रेसशिवाय करमणार नाही. त्यामुळे काळजी करू नकोस", असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केले होते.

थोरातांच्या वक्तव्यानंतर आमदार सत्यजित तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जातील असे वाटत होते. मात्र थोरातांच्या या वक्तव्यानंतर तांबे यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मात्र आज त्यांनी एक सूटच ट्वीट केले आहे. (Maharashtra Political News)

Satyajit Tambe's Indicative tweet,
IT Raid on BBC: बीबीसीच्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, कर्मचाऱ्यांचे फोन जप्त

सत्यजित तांबे यांनी केलेल्या या ट्वीटवरून पुन्हा राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. सत्यजित तांबेंनी ट्वीटमध्ये "उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी" असे म्हटले आहे.

तांबे यांच्या या ट्वीटमुळे ते अजूनही काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे बाळासाहेब थोरात हे तांबेंचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्नशील असताना सत्यजित तांबे मात्र काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छुक नाहीत का? असा प्रश्न या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com