Maharashtra School: राज्यातील शाळांचं पूर्ण स्वरूप बदलणार! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

State Government News: महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूपच बदलणार असून केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात देखील लागू करण्यात येणार आहे.
Maharashtra School
Maharashtra Schoolsaam tv
Published On

>>सूरज सावंत

Maharashtra School : राज्यातील शाळांचे पूर्ण स्वरूप बदलण्याबाबातचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूपच बदलणार असून केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात देखील लागू करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया' महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीमंडळामध्ये खलबते झाली.

Maharashtra School
Vinayak Raut News: 'गद्दाराला मुख्यमंत्रीपदावर बसवून...'; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर राऊतांची तिखट प्रतिक्रिया

केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनंतर्गत देशात १४ हजार ५९७ शाळा सुरु करण्यात येणार आहे. आदर्श शाळा म्हणून या शाळा ओळखल्या जातील असे सांगितले जात आहे. देशातील १८ लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. (Latest Marathi News)

काय आहे पीएमश्री योजना?

- या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल.

- शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

- विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठीही उपायोजना सुचवल्या जातील. (Maharashtra School)

Maharashtra School
IT Raid on BBC: बीबीसीच्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, कर्मचाऱ्यांचे फोन जप्त

- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल.

- केंद्र सरकारच्या या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे.

- वास्तविक जीवनाशी निगडित प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या योजनेत आहे.

- या शळांमध्ये स्मार्ट क्लास, ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा आधुनिक सोयी व सुविधा असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com