विनायक वंजारे
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'गद्दाराला मुख्यमंत्रीपदावर बसवून त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय हे देवेंद्र फडणवीसांच दुर्दैव आहे, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
पहाटेचा शपथविधी पवारांसोबतच्या चर्चे नंतरच झाल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारख्या कर्तबगार व्यक्तीला डावललं. त्यानंतर एका गद्दाराला मुख्यमंत्री म्हणून बसवलं. त्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस यांना काम करावं लागतंय हे फडणवीसांचं दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक तोल बऱ्यात वेळेला घसरतो. त्यातून फडणवीस अशी वक्तव्य करतात'.
'शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करायचा फडणवीस यांचा धंदा झालेला आहे. स्वतःचं सरकार आता बुडत चाललेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल, तेव्हा या सरकारच विसर्जन होईल. त्यामुळे स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी ते अशा प्रकारचे आरोप करतात, अशा शब्दात विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते?
'पहाटेच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच अजित पवार जर बोलले तर मी पुढे बोलेन, असे फडणवीस म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.