Sanjay Raut News: 'देवेंद्र फडणवीस जगातलं दहावं आश्चर्य, २ दिल्लीत बसलेत'; संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut On Devendra Fadnavis: फडणवीसांच्या या खुलास्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra fadnavis - Sanjay Raut
Devendra fadnavis - Sanjay RautSaam tv

Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

'देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. दोन दिल्लीत बसलेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Latest Marathi News)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत बोलत होते. संजय राऊत म्हणाले,'शरद पवार यांच्याशी बोलून पहाटेचा शपथविधी झाला असता, तर नक्कीच सरकार चाललं असतं. ते सरकार ७२ तासात कोसळलं नसतं. देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काय बोलू. अलीकडे त्यांचे वक्तव्ये पाहतोय'.

Devendra fadnavis - Sanjay Raut
Aaditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले जे सत्य आहे ते...

'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जगातील दहावं आश्चर्य आहे. दोन दिल्लीत बसलेत. माणसानं किती खोट बोलावं. त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचे मान्य केलं होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वत:चं वक्तव्य पाहावं. ते स्वत: अमित शाह यांच्यासमोर सत्तेचा पन्नास टक्के वाटा देण्याबाबत बोलले होते, असे संजय राऊत म्हणाले.

'४० आमदारांचा शपथविधी हा देखील शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाला, असेही ते सांगू शकतात. ते एका वैफल्यातून बोलत आहे. विधानपरिषदेत भाजपचा पराभव झाला. नागपूर-विदर्भातही ते हरले. उद्याच्या पोटनिवडणुका या कसबा आणि चिंचवड येथे होत आहेत. तेथे त्यांना दारुण पराभव दिसत आहे . त्यामुळे लोकांना भ्रमित करण्यासाठी असे विधान फडणवीस करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Devendra fadnavis - Sanjay Raut
Sharad Pawar : 'ते असं बोलतील वाटलं नव्हतं', फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी गौप्यस्फोटावर शरद पवारांची प्रतिक्रिया

'अजित पवार हे महाविकास आघाडीचे नेते म्हणून सत्ताधाऱ्यांना आव्हान देत आहे. पण प्रतिमांना तडे देण्यासाठी अशी विधाने त्यांच्याकडून केली जात आहे. पहाटेच्या शपथविधीला दचकून फडणवीस जागे आहेत. त्याची कारणे शोधून त्यांनी उपचार करून घेतले पाहिजे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com