Satish bhosale : 'खोक्या' आणखी गोत्यात; आधी उत्तर प्रदेशातून मुसक्या आवळल्या, आता बीड पोलिसांकडून मोठी कारवाई

Satish Bhosale News : बीडचा 'खोक्या' आणखी गोत्यात आला आहे. उत्तर प्रदेशातून खोक्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आता बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Satish bhosale
Satish bhosaleSaam Tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेने ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. खोक्याने केलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच तो फरार झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधावर होते. आज पोलिसांनी खोक्याला बेड्या घातल्या. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता त्याच्याविरोधात तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.

Satish bhosale
Pune Crime : अनैतिक संबंधात अडसर; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह पोत्यात घालून दुचाकीने नेलं अन्..

बीडमधील खोक्या उर्फ सतीश भोसलेला उत्तर प्रदेशमध्ये अटक होताच तडीपारचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. गेल्या एक वर्षापासून उपविभागीय अधिकारी बीड यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित होता. बीड पोलिसांनी वर्षभरापूर्वीच सादर प्रस्ताव सादर केला होता. खोक्याच्या तडीपारच्या प्रस्तावाला मंजुरीही अटकेनंतर मिळाली.

Satish bhosale
Santosh Deshmukh : शांत स्वभावाच्या माणसासोबत विपरीत घडलं; सरंपच संतोष देशमुखांचा मृत्यूआधीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, VIDEO

खोक्या उर्फ सतीश भोसलेवर एकूण बारा गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शिरूर पोलीस ठाणे, आष्टी पोलीस ठाणे, पाटोदा पोलीस ठाणे आणि आंबोरा पोलीस ठाण्यामध्ये एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. सतीश भोसलेच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ होणार आहे. त्याच्यावर तडीपारची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी केली आहे.

Satish bhosale
Gujarat Crime News: दुसऱ्या लग्नाच्या खुळापायी पोटच्या पोराला संपवलं; ७६ वर्षाचा बाप बनला हैवान

खोक्याचा अटकेचा थरार

बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या अटकेमागचा थरार सांगितलाय. 'सतीश भोसलेवर गुन्हा नोंदवल्यापासून फरार होता. खोक्याच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचं लक्ष होतं. पोलिस त्याचा मागावर होते. त्याचा पाठलाग करत असताना तो प्रयागराजमध्ये असल्याचे कळाले. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी त्याला अटक केली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com