
Beed Khokya Satish Bhosale Arrested : सुरेश धसांचा कार्यकर्ता, गुंड खोक्या भोसले याला बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या. आठ दिवसांपासून बीड पोलिस खोक्याच्या मागावर होते, पण तो गुंगारा देत होते. अखेर पोलिसांनी त्याचं लोकेशन स्ट्रेस केलं अन् बेड्या ठोकल्या. खोक्या भोसले याला अटक केल्यानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये खोक्या भोसले शांत उभा असल्याचे दिसतेय.
बीड पोलीस पथकाने प्रयागराजमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेला अटक केली त्यावेळचा फोटो समोर आला आहे.
पाहा खोक्याचा फोटो -
आठवडाभरापासून खोक्या पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला प्रयागराज येथेल विमानतळावरून आज अटक करण्यात आली. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी खोक्याला सापळा रचून अटक केली. त्याला आज किंवा उद्या बीडमध्ये आणले जाणार आहे, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी दिली. खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.
खोक्या भोसले याच्यावर मागील १० दिवसांत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून खोक्या भोसले फरार आहे. पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध घेतला जात होता. खोक्याचे शेवटचं लोकेशन प्रयागराज असल्याचे आढळले. बीड पोलिसांनी त्याला विमानतळावरून बेड्या ठोकल्या. बीड पोलिसांनी प्रयागराज येथील पोलिसांसोबत समन्वय साधत गुंगारा देण्याच्या तयारीत असणाऱ्या खोक्याला बेड्या ठोकल्या.
खोक्याला बुधवारी बीडमध्ये आणले जाणार आहे. दुसऱ्या राज्यात त्याला अटक केली आहे, त्यामुळे त्याला ट्रांझिट रिमांडवर घ्यावे लागणार आहे. स्थानिक न्यायालयाची आणि पोलिसांची परवानगी घेऊन ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.