Trekking: ज्येष्ठांसह साताऱ्यातील युवकांनी लिंगाणा केला सर

सर्व मोहिमवीर अतिशय दुर्गम असणारे मोहरी गावात पोहचले.
trekkers at lingana fort
trekkers at lingana fortSaam Tv
Published On

सातारा : साताऱ्यातील (satara) गणेश शिंदे आणि संतोष खामकर या तरुणांनी नव्या पिढीला एक नवा आदर्श घालून दिला आहे. नवीन वर्षाच्या स्वागत कोणताही जेवणावळी किंवा धिंगाणा घालून न करता या तरुणांनी दुर्गनाद ट्रेक अँड एडव्हेंचर या ग्रुपच्या माध्यमातून २१ जणांना घेऊन महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजला जाणारा किल्ले लिंगाणा (lingana fort) सर केला आहे. (satara youths climbed lingana fort trekking latest marathi news)

trekkers at lingana fort
Republic day: महाराष्ट्राच्या चित्ररथात जैवविविधता; कास पठारासह, शेखरु

किल्ले (fort) लिंगाणा याची उंची साधरणत: तीन हजार फूट आहे. लिंगाणा माचीपासून एक हजार फुटाचे प्रस्तारोहन करून चढाई (trekking) करावी लागते व रॅपलिंग करून उतरावे लागते. सर्व मोहिमवीर अतिशय दुर्गम असणारे मोहरी गावात पोहचले. पहाटे तीनला बोरट्याची नाळ उतरायला सुरुवात करून मोहिमेस प्रारंभ केला. सर्वजण पाच वाजता लिंगाणा माची येथे सुखरूप पोहचले. त्यानंतर साडे पाच वाजता सर्वांनी लिंगाणा माचीपासून चढाईस प्रारंभ केला. सकाळी साडे आठला २१ मोहिमवीर लिंगाण्याचा टोकावर (trekkers at lingana fort) पोहचले. येथे छत्रपती शिवरायांची (shivaji maharaj) आरती आणि जयजयकार करून पुन्हा साधारणत: नऊ वाजता खाली उतरायला सुरुवात केली. साधारणत: सायंकाळी पाच वाजता मोहरी गावात पोहचले.

या मोहिमेत ६२ वर्षाचे प्रभाकर ढवळे, ६१ वर्षाचे मधुकर जगदाळे, ५५ वर्षाच्या सुरेखा जगदाळे, यांच्यासह आकाश कदम, रोहित शिंदे, मंगेश यादव असे सुमारे १८ जण कोल्हापूर, सांगली, भागातून आले होते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com