Republic day: महाराष्ट्राच्या चित्ररथात जैवविविधता; कास पठारासह, शेखरु

या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे.
biodiversity standards in maharashtra tableau
biodiversity standards in maharashtra tableauSaam Tv
Published On

मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी (republic day) होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ (biodiversity in maharashtra) यावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Cultural Affairs Minister Amit Deshmukh) यांनी दिली. (biodiversity standards in maharashtra chitrarath will pe presented on republic day in delhi)

देशमुख म्हणाले महाराष्ट्रात पर्यावरणप्रेमींसह विविध संस्था तसेच सरकार देखील पर्यावरणाचे सरंक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत असते. यंदा दिल्लीच्या राजपथावर ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ हा चित्ररथ (biodiversity standards in maharashtra tableau) आपण साकारणार आहाेत. त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत.

biodiversity standards in maharashtra tableau
पुढच्या वर्षी पहिलीत जाणा-या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

देशमुख पुढं म्हणाले युनेस्कोच्या यादीत सातारा (satara) जिल्ह्यातील ‘कास पठार’चा समावेश आहे. याबराेबरच शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य (sanctuaries) राखीव ठेवलेत. अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती राज्यात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी, ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घाेषीत करण्यात आले आहे. राज्यातील आपली हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

या चित्ररथाच्या पुढच्या भागात ‘ब्ल्यू मॉरमॉन’ (Blue Mormon) फुलपाखराची (butterfly) आठ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. त्याव्यतिरिक्त सुमारे दीड फूटाचे राज्यफुल ‘ताम्हण’ (Tamhan) याचे माेठ्याले गुच्छ ठेवण्यात आले आहेत. त्यावर देखील अन्य छाेटी छाेटी फुलपाखरांच्या प्रतिमा आहेत. या चित्ररथावर सुमारे १५ फूटाचे ‘शेकरू’ (Shekru) तसेच युनेस्कोच्या (UNESCO) यादीतील कास पठाराची (Kass Pathar) (Kass Plateau) प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा ‘सुपारबा’ (Suparba) हा सरडा ३ फूटाचा उभारण्यात आला आहे. त्याच्यापाठीमागे राज्यपक्षी हरियालची (Hariyal) तसेच शेवटच्या टप्प्यात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे आंब्याचे झाड (mango tree) सुमारे १५ फूटांपर्यंतचे असेल.

या बराेबरच दुर्मिळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली (Amboli) झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत.

महाराष्ट्रातील (maharashtra) वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com