Satara News : साता-यातील एका युवकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने पाेलिसांनी दाेन युवकांसह महिलेस ताब्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. साता-यातील राजवाडा या मध्यवर्ती युवकावर हल्ला झाल्याची माहिती समजताच पाेलिसांचा फाैज फाटा परिसरात दाखल झाला हाेता. एसपी समीर शेख (samir shaikh sp satara) यांनी देखील स्वत: घटनास्थळी दाखल हाेत कनिष्ठ पाेलिस अधिका-यांना तपासाबाबत सूचना केल्या. (Maharashtra News)
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार राजधानी टॉवर परिसरात शुक्रवारी गणेश शंकर पैलवान (राहणार चिपळूणकर बाग, मंगळवार पेठ, सातारा) यांच्यावर जुन्या वादातून हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर गणेश यास क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले.
सातारा येथील चिपळूणकर बाग परिसरात गणेश शंकर पैलवान हे राहण्यास आहेत. छोटीमोठी कामे करुन त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची त्याच परिसरात राहणाऱ्या काही जणांशी वादावादी झाली होती. वादावादीनंतर झालेल्या मारामारीबाबत गणेश पैलवान यांनी याची अदखलपात्र तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती.
या तक्रारी अनुषंगाने चौकशी सुरू होती. शुक्रवारी दुपारी गणेश पैलवान हे कामानिमित्त तांदूळआळी येथे आले होते. याचठिकाणहून परतत असताना राजधानी टॉवर समोरील मुख्य रस्त्यावर त्यांना वाद झालेल्यांपैकी एक महिला व 2 युवक भेटले.
याठिकाणी पुन्हा त्यांच्यात किरकोळ वाद झाला. वादानंतर त्याठिकाणी महिलेसोबत असणाऱ्यांनी गणेश पैलवान यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यावेळी धारदार शस्त्राने गणेश पैलवान यांच्या डोक्यात वार केला. हा वार जिव्हारी लागल्याने गणेश पैलवान हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.
यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर (satara) शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू केले.
रात्री उशिरा पोलिस अधिक्षक समीर शेख (samir shaikh superintendent of police satara) यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाच्या सुचना पोलिस निरीक्षक संजय पतंगे व कर्मचाऱ्यांना केल्या. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह 2 युवकांना ताब्यात घेतले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.