Phaltan Doctor Death: अखेरच्या सेल्फीमधून धक्कादायक खुलासा; आत्महत्येआधी डॉक्टर तरुणीची दोघांपैकी एकाशी चॅटिंग

Satara Phaltan Doctor Death Case: फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झालाय. तरुण डॉक्टरचा शेवटचा सेल्फी आणि एका आरोपीसोबतच्या चॅटिंग केल्याची माहिती समोर आली आहे.
Satara Phaltan Doctor Death Case
Phaltan doctor’s last selfie and chat reveal shocking truth behind herself killingsaam tv
Published On
Summary
  • डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात नवीन अपडेट

  • आत्महत्येपूर्वीचा सेल्फी आणि चॅटिंगमधून धक्कादायक माहिती उघड

  • सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिकारी आणि खासदाराच्या पीएवर गंभीर आरोप करण्यात आलेत.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. पोलीस अधिकारी गोपाळ बदने आणि स्थानिक खासदाराच्या पीएच्या दबावातून आत्महत्या करत असल्याच तरुणीने हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. आता याप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे.

बनकरच्या मोबाईलमधून फोटो पोलिसांना मिळाले

मृत डॉक्टरने आत्महत्या करण्याआधी एक सेल्फी फोटो काढला होता. आणि हा फोटो प्रशांत बनकरला पाठवला होता, अशी माहिती समोर आली. महिला डॉक्टरने लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या मोबाईलवर पाठवला होता. प्रशांत बनकरच्या मोबाईल मधून हे फोटो पोलिसांना मिळाले आहेत.

महिला डॉक्टरने मृत्यू होण्याआधी प्रशांत बनकरसोबत व्हाट्सअप चॅटिंग सुद्धा केलं होतं. त्यावेळी तिने लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी पाठवला होता. प्रशांत बनकरचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर डिजिटल तपासणी करण्यात आली यावेळी हा फोटो पोलिसांच्या समोर आलाय.

Satara Phaltan Doctor Death Case
Phaltan Doctor Case:सातारा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागले डॉक्टर आणि आरोपीमधील चॅटिंग अन् सीसीटीव्ही फुटेज

व्हाट्सअप चॅट डिलीट झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

डॉक्टरचे व्हाट्सअप चॅट डिलीट झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मिळालेले सर्व डिजिटल पुराव्याची सायबर टीममार्फत तपासणी सुरू केलीय. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केलंय.

Satara Phaltan Doctor Death Case
Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

काही दिवसांपासून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. डॉक्टरच्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली. यात तिने एका पोलीस अधिकाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर लैंगिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com