Phaltan Doctor Case:सातारा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागले डॉक्टर आणि आरोपीमधील चॅटिंग अन् सीसीटीव्ही फुटेज

Satara Doctor Case : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सातारा पोलिसांनी फोन चॅट रेकॉर्ड आणि हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. एसपी तुषार दोषी यांनी आरोपी आणि डॉक्टर यांच्यात वारंवार चॅटिंग सुरू असल्याचा खुलासा केलाय.
Satara Doctor Case
Satara police recover crucial digital evidence — phone chats and CCTV footage — in Phaltan woman doctor suicide case.Saam
Published On
Summary
  • महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवे खुलासे समोर आलेत.

  • पोलिसांना फोनवरील चॅटिंग आणि हॉटेल सीसीटीव्ही फुटेज मिळालेत.

  • आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. डॉक्टरने आपल्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून जीवन संपवलं होतं. या प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज महत्वाचे खुलासे केलेत. मृत महिला डॉक्टर आणि आरोपी यांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होतं, असा खळबळजनक खुलासा पोलीस अधिक्षकांनी केलाय.

फलटण शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटकेत आहेत.दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांचा डीवायएसपी यांच्यामार्फत तपास सुरूय. सीडीआर असेल किंवा इतर पुरावे, यामार्फत आरोपीविरुद्ध काय पुरावे मिळतात का याबाबत तपास सुरू आहे.

Satara Doctor Case
Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?

प्राथमिक पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मिळाले असून फायनल रिपोर्ट आज किंवा उद्या मिळेल, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिलीय. काही फॉरेन्सिक रिपोर्ट देखील लवकरच हाती येतील,असेही पोलीस म्हणालेत. त्यानुसार डॉक्टर महिला आणि आरोपी यांच्यात नक्की संबंध होते का हे तपासातून समोर येईल, असेही पोलीस अधीक्षक तुषार दोषी म्हणालेत.

Satara Doctor Case
'...तर डॉक्टर तरूणीचे प्राण वाचले असते'; पोलिसांच्या हाती CCTV फुटेज, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सीसीटीव्ही फुटेज मिळालेत

पोलिसांच्या हाती हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. यात महिला डॉक्टर हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. हॉटेलमधील डीव्हीआर पोलिासंनी जप्त केलाय. डीव्हीआर तपासला असता, कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाहीये. तरीसुद्धा ती हॉटेलवर का गेली याचा पूर्ण तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलीय.

डॉक्टर महिलेचे वारंवार चॅटिंग

या प्रकरणाच्या तपासा संदर्भामध्ये आमच्यावर कोणाचाही दबाव नाहीत. गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा, अशा सूचना आम्हाला मिळाल्याची माहिती पोलीस अधिक्षक म्हणालेत. त्यानुसार तपास चालू असून आता आरोपीचे सीडीआर आणि चॅटिग हाती आली आहे. यात मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होतं. डॉक्टर महिला आरोपींच्या संपर्कामध्ये होती, असा खुलासा पोलीस अधिक्षकांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com