Doctor Case : मृत महिला डॉक्टरचा हॉटेलमधील पहिला CCTV व्हिडिओ समोर, रूममध्ये संपवलं होतं आयुष्य

Satara Woman Doctor Suicide Case: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात हॉटेलमधील पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. डॉक्टर रूममध्ये जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
Satara woman doctor suicide CCTV video
Satara woman doctor suicide CCTV videoSaam TV Marathi News
Published On

ओमकार कदम, सातारा प्रतिनिधी

Satara woman doctor suicide CCTV video : साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या अन् बलात्कार प्रकरणात दररोज नवीन खुलासे आणि आरोप होत आहेत. मृत महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचा आणि रूममध्ये एन्ट्री केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फलटणमधील नामांकित हॉटेल मालकाकडून त्या महिला डॉक्टरचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये डॉ. महिला हॉटेलमध्ये एन्ट्री करताना आणि रूमध्ये जाताना दिसत आहे. (Doctor’s CCTV footage viral on social media)

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर महिलेने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेल मालकाने डॉक्टरच्या एन्ट्री आणि हॉटेलच्या रूममध्ये जातानाचा सीसीटीव्ही जारी केला आहे. या सीसीटीव्हीमध्ये महिला डॉक्टर हॉटेलच्या रूममध्ये जात असल्याचे दिसतेय. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूने तपास करण्यात येत आहे. राजकीय आरोपही या प्रकरणात होत आहे.

पाहा व्हिडिओ....

बीडमधील महिला डॉक्टर फलटणमधील सरकारी रूग्णालयात कार्यरत होती. गेल्या आठवड्यात तीने फलटणमधील नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्याआधी घरमालक प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने यांचं नाव लिहून आत्महत्या केली. महिला डॉक्टराने चार वेळा बलात्कार झाल्याचाही आरोप केला होता. या प्रकारानंतर राज्यात खळबळ उडाली. यामध्ये राजकीय कनेक्शनही जोडण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. या प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे.बनकर आणि बदने सध्या पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी करण्यात येत आहे.

Satara woman doctor suicide CCTV video
Local Body Election : धुरळा उडणार, तयारीला लागा! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट...

कोणतेही पुरावे डिलीट झालेले नाहीत - तुषार दोषी

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मयत डॉक्टरचे मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झालेले नाहीत. याबरोबरच कोणतीही डॉक्टरची वैयक्तिक तक्रारी अथवा माहिती, असलेली डायरी मिळालेली नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी माहिती दिली.

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डॉक्टर यांचे व्हाट्सअप चॅट डिलीट झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मिळालेले सर्व डिजिटल पुराव्याची सायबर टीममार्फत तपासणी सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये याबरोबरच डॉक्टर महिलेची वैयक्तिक माहिती असणारी किंवा तक्रारी दिलेली अशी कोणतीही डायरी सापडलेली असल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहे.

Satara woman doctor suicide CCTV video
Maharshtra politics : विधानसभा निवडणुकीआधीच निकालाबाबत मोठी भविष्यवाणी, जयंत पाटील यांनी आकडाच सांगितला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com