Satara News: अलिशान रिसॉर्टमध्ये मध्यरात्री 'छमछमाट', पोलिसांनी टाकली धाड; ६ डॉक्टरांसह ४ तरुणी रंगेहाथ पकडल्या

Satara News: याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं.
Satara Crime News
Satara Crime NewsSaam TV
Published On

Satara Crime News

साताऱ्यातील पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ४ तरुणींसह ५ डॉक्टर दारुच्या नशेत अश्लिल कृत्य करताना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Satara Crime News
Maharashtra Politics: राजस्थान-मध्यप्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही धक्कातंत्र; अजित पवारांनी सांगितला महायुतीचा प्लान

थंड हवेचे ठिकाण पाचगणी कासवंड (Satara News) गावाजवळ स्प्रिंग रिसॉर्ट नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमधील पाठीमागच्या हॉलमध्‍ये सांगली आणि पुण्यातून काही तरुणी आल्या आहेत. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांसमोर तोकड्या कपड्यात वावरणे, अश्लिल हावभाव करणे, अंगविक्षेप करत नाचणे, असा प्रकार या तरुणींकडून सुरू आहे.

त्यामुळे या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढली आहे. दरम्यान, खबऱ्याने या संपूर्ण प्रकाराची माहिती साताऱ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Police) आचल दलाल यांना दिली. त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत विशेष पथकाची नेमणूक करत कारवाईसाठी पाठवले.

विशेष पथकाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक रिसॉर्टवर छापा टाकला. यावेळी तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील ५ आणि मिरज एक असे डॉक्टर ६ जण दारुच्या नशेत तरुणींसोबत नाचताना आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचालकासह ४ तरुणी आणि ६ डॉक्टरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. रिसॉर्टवर अचानक पोलिसांनी धाड टाकल्याचं कळताच आंबट शौकिनांचे चांगलेच धाबे दणादणले आहेत. याप्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Satara Crime News
Heart Attack Case: डीजेच्या तालावर नाचताना अचानक कोसळला; अवघ्या १० सेकंदातच तरुणाचा गेला जीव, दुर्देवी घटना!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com