

ओंकार कदम, प्रतिनिधी...
Satara Accident: सातारा- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली. सातारा शहरातील बॉंम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ तवेरा गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा शहरातील बॉंम्बे रेस्टॉरंट चौकात टायर फुटल्याने तवेरा गाडीचा भीषण अपघात झाला. या भयंकर अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात झालेली तवेरा गाडी नवी मुंबईहून जयसिंगपूरकडे निघाली होती. बॉंम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ चालू गाडीचा टायर फुटल्याने समोर असणाऱ्या पिकप टेम्पोला जोरदार धडक दिली. ज्यामुळे हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये 2 पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे.
अपघात इतका भीषण होता की, तवेरा गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. साखर झोपेत असतानाच तिघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.