satara, rasta roko andolan, water supply
satara, rasta roko andolan, water supplysaam tv

Satara Rasta Roko Andolan News : स्वच्छ पाणीपूरवठ्यासाठी शेकडाे सातारकरांनी राेखला माेती चाैक

यावेळी नागरिकांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
Published on

Satara News : स्वच्छ पाणीपूरवठा करा या मागणीसाठी आज (गुरुवार) साता-यातील पश्चिम भागातील शेकडाे नागरिक रस्त्यावर उतरले. मंगळवार पेठ, ढाेणे काॅलनीतून माेर्चाने आलेल्या नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत रास्ता राेकाे आंदाेलन करत सातारा पालिका (satara palika) प्रशासनाचा निषेध नाेंदविला. या आंदाेलानमुळे वाहतुक खाेळंबली गेली. (Maharashtra News)

satara, rasta roko andolan, water supply
420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

साताऱ्यातील (satara) ढोणे कॉलनी , मंगळवार पेठ या भागात अनेक दिवसांपासून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्याबाबतची माहिती नुकतीच स्थानिक माजी नगरसेवकांनी पालिका प्रशासनास निवदेनाच्या माध्यमातून दिली हाेती. स्वच्छ पाणीपूरवठा न झाल्यास आंदाेलनाचा इशारा देखील त्यावेळी देण्यात आला हाेता.

satara, rasta roko andolan, water supply
Police Bharti चा निकाल लागला अन् अख्ख गाव नाच नाच नाचलं, पहिल्यांदाच गावातील युवक बनला पाेलीस

आज या भागात पाणीपूरवठा झाल्यानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी माजी नगरसेवक रवींद्र ढोणे यांची भेट घेतली. त्यानंतर ढाेणे यांच्यासह शेकडो नागरिक घंटा नाद करत शहरातील राजवाडा भागात मोर्चाने आले.

त्यानंतर माेती चाैक येथे नागरिकांनी रास्ता रोको केला. सातारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाण्याबाबत काेणतीच कार्यवाही न केल्याने आंदाेलन छेडल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com