Satara News: डोळ्यादेखत लेक नदीत पडला, मूकबधीर आईला ओरडताही आलं नाही; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Satara Breaking News: हणमंतची आईसुद्धा मुकबधीर आहे. माणगंगा नदी सध्या पुर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे दोरखंडाच्या सहाय्याने नदी पार करून शेतात जावे लागत आहे.
Satara News: डोळ्यादेखत लेक नदीत पडला, मूकबधीर आईला ओरडताही आलं नाही; काळीज पिळवटून टाकणारी घटना
Satara Breaking News: Saamtv
Published On

म्हसवड, ता. १६ सप्टेंबर

Boy Drowned in Man River: आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या मुकबधीर विद्यार्थ्यांचा माण नदी पात्रातील बंधा-यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. १५ सप्टेंबर) घडली. माण नदीवरील म्हसवड पालिकेच्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहीरजवळ ही दुर्दैवी घटना घडली. गणपतीच्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या मुलाचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

Satara News: डोळ्यादेखत लेक नदीत पडला, मूकबधीर आईला ओरडताही आलं नाही; काळीज पिळवटून टाकणारी घटना
Maharashtra Politics : 'फेक न्यूजची फॅक्टरी, खोट्या बातम्या पसरवणं एवढंच काम'; थोरातांचा शिंदे -देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हणमंत मोहन शेंबडे हा मुकबधीर विद्यार्थी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून तो सातारा येथील मुकबधीर विद्यालयात शिक्षण घेत आहे. गणेशोत्सवानिमित्त तीन चार दिवस सुट्टी असल्याने तो गावी आला होता. दुपारी हणमंत शेंबडे हा आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेला होता. हणमंतची आईसुद्धा मुकबधीर आहे. माणगंगा नदी सध्या पुर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे दोरखंडाच्या सहाय्याने नदी पार करून शेतात जावे लागत आहे.

हणमंतसुध्दा आईला नदीच्या काठावर उभा करून दोरखंडाच्या सहाय्याने नदीपार करत होता. मात्र नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर हणमंत शेंबडे यांचा हातातून कासरा निसटला आणि तो नदीच्या पाण्यात वाहत गेला. मुलगा पाण्यात वाहत गेल्याचे त्या आईनं घरी पळत जाऊन वडील मोहन शेंबडे व इतरांना सांगितले.

Satara News: डोळ्यादेखत लेक नदीत पडला, मूकबधीर आईला ओरडताही आलं नाही; काळीज पिळवटून टाकणारी घटना
Chhattisgarh Crime: संतापजनक! काळी जादू करण्याचा संशय; गावकऱ्यांनी ३ महिलांसह ५ जणांची केली हत्या

ही घटना घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस, म्हसवड पालिकेचे कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या हणमंतचा युद्ध पातळीवर शोध सुरू केला परंतु सायंकाळी उशिरापर्यंत तरी हणमंत शेंबडे यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, आईच्या डोळ्यादेखत मुलगा वाहून गेला, मात्र मुकबधिर असल्याने त्यांना ओरडताही आलं नाही. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Satara News: डोळ्यादेखत लेक नदीत पडला, मूकबधीर आईला ओरडताही आलं नाही; काळीज पिळवटून टाकणारी घटना
Marathwada Politics: उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा! भुमरे-बोरनारेंचं टेंशन वाढणार? काय आहे ठाकरेंची नवी रणनीती? वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com