कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर फेक न्यूजवरून हल्लाबोल केलाय. थोरात यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ? असा सवाल देखील केलाय. तर सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करणं. एवढं एकच काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ करत असल्याची टीका देखील थोरात यांनी केलीय.
बाळासाहेब थोरात यांनी ( Congress Leader Balasaheb Thorat) त्यांच्या X सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अगोदर राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलंच नाही, त्याबद्दल फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी केल्याचा आरोप थोरात यांनी केलाय. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये जे घडलेच नाही, त्याबाबत फेक न्यूज पसरवून राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं थोरातांनी म्हटलंय.
राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे जनता फेक नॅरेटीव्हसोबत तुमचंही सरकार देखील उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारला दिलाय. कर्नाटकामधील गणपती मूर्तीच्या वादावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला धारेवर धरलं होतं. शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट करत म्हटले होते की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. गणपती उत्सव थांबवून मूर्तीही जप्त करण्यात आली. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील जनता काँग्रेस सरकारला चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं होतं.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या आरोपाचं खंडन करत एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्लाबोल केलाय. पोलीस व्हॅनमध्ये गणेशमूर्ती ठेवण्याच्या मुद्द्यावरून कर्नाटकमध्ये वातावरण तापलंय. भाजप (Devendra Fadnavis) नेते कर्नाटकचे काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधत आहेत. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये दिसतंय की, बाप्पाची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवण्यात (Maharashtra Politics) आलीय. या मुद्द्यावरून तीव्र राजकारण सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.