Crime News
Crime NewsSaam TV

Crime News: चार दिवसांत पाेलिसांनी लावला खूनाचा छडा; सटाण्यातील एकास अटक

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी तपासाची दिली माहिती.
Published on

- तबरेज शेख

नाशिक : घरी गेल्याच्या किरकाेळ कारणावरुन एकाचा डाेक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक (nashik) सटाणा (satana) येथे घडली हाेती. सटाणा पाेलिसांनी (satana police) यांनी चार दिवस कसून तपास करीत मुख्य संशयितास अटक (arrest) केली आहे. (nashik latest marathi news)

याबाबत अधिक माहिती अशी : तीन एप्रिलला सटाणा येथील कंधाणे फाटा नजकीच्या मोरेनगर शिवारातील हॉटेल गुरूकृपाचे पाठीमागे मोकळ्या जागेत घमजी रंगनाथ माळी (वय ४५) यांचा मृतदेह सापडला हाेता. सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार व स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) घटनास्थळाची पाहणी करून घमजी माळी यांच्या दैनंदिन कामकाज व राहण्याची माहिती घेतली.

Crime News
Amravati: संजय बियाणींच्या मारेक-यांना अटक करा; अमरावतीत माेर्चा

पाेलिसांना तपासात माळी यांचा खून झाल्याच्या घटनास्थळापासून १५ फूट अंतरावर असलेल्या हिरामण पवार यांच्या घर असूनही ताे व त्याचे कुटूंब उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्यांच्या हालचाली देखील संशयास्पद वाटल्या. हिरामण पवार या संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याचे कबूली दिली.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले दाेन एप्रिलला रात्री १० ते ११ वाजता घमजी माळी हा हिरामणी पवार याच्या घरी गेला. त्यामुळे पवार यास राग आला. राग अनावर झाल्याने पवार याने माळी याच्या डोक्यात बाटली मारुन खाली पाडले व दगड डोक्यात घालून ठार केले असे त्याने कबूली जबाबात सांगितं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Crime News
Maharashtra Kesari: बाला रफिकचा पराभव; दिग्गज मल्लांत आज उपांत्य फेरीची लढत
Crime News
Hingoli: राजस्थानच्या मामाच्या खून प्रकरणी गोरेगावात भाच्यास अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com