MP Bajrang Sonawane: संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर.. शरद पवारांच्या खासदाराचा फडणवीस सरकारला इशारा

MP Bajrang Sonawane Demands Action: बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केलीय. तसेच न्याय मिळाला नाही तर, उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय.
Bajrang Sonawane
Bajrang SonawaneSaam Tv News
Published On

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. या घटनेनंतर अनेक नेत्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेत आधार दिला. तसंच देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र अजूनही आरोपी मोकाट असून, फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केलीय. तसंच न्याय मिळाला नाही तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

देशमुख प्रकरणात बजरंग सोनवणे काय म्हणाले?

काही नेते मुंबई आणि दिल्लीत बसून आमच्या बीड जिल्ह्याचं नाव खराब होत आहे असं म्हणतात. पण त्यासाठी आधी जिल्ह्यात येऊन काम करावं लागतं. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. तेव्हा जिल्ह्यात काय चालू आहे हे कळतं. पण तुम्ही बीड जिल्ह्यातील लोकांना का भेटत नाही? त्यांच्याशी समोर येऊन का बोलत नाही? फक्त नागपूर आणि मुंबईमधून बोलता, पण जिल्ह्यात येऊन त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांना आधार द्यायला हवा. मात्र असं काही होताना दिसत नाही. अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

Bajrang Sonawane
Santosh Deshmukh case : संतोष देशमुख हत्या प्रकरण, आज बीडमध्ये मूक मोर्चा, पोलीस सज्ज

तसंच बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही. असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्येच्या या घटनेला आज २० दिवस झाले आहेत. यातील ४ आरोपी अटकेत आणि ३ आरोपी अद्याप फरार आहेत. याची लिंक खंडणीशी आहे. याचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध झाला पाहिजे. पोलिसांनी तपास करावा आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

Bajrang Sonawane
Santosh Deshmukh News : जिकडे पाहावं तिकडे गर्दीच गर्दी, पाय ठेवायलाही जागा नाही, बीडच्या मोर्चात गर्दीचा उच्चांक | VIDEO

देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार

उपोषण करण्याचा निर्णय हा माझा आहे. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला ज्यांनी निवडून आणलं, त्यांच्या न्यायासाठी लढणं हे माझं काम आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर नवीन वर्षात मी उपोषणाला बसणार. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढत राहणार. असा थेट इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com