Anil Gote News: संतोष देशमुख प्रकरणात ठाकरे गटाची उडी; माजी आमदाराचा CM फडणवीसांवर हल्लाबोल

Anil Gote : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केलाय.
Santosh Deshmukh Anil Gote
Santosh Deshmukh Anil GoteSaam Tv News
Published On

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून फक्त बीड नसून, राज्यभरातलं वातावरण तापलंय. तसेच राजकीय पक्षांनी देखील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, असा तगादा लावून धरला. मात्र, ७ आरोपी अटकेत असून, अद्याप एक फरार आहे. याच प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत सध्याचे सरकार हे गुन्हेगारांचे सरकार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यात मोर्चे निघाले, आंदोलने करण्यात आली, परंतु सरकारवर काडीमात्र फरक पडलेला नसल्याचं म्हणत टीका केली आहे.

Santosh Deshmukh Anil Gote
Kolhapur Gang: कोल्हापुरात 'मुळशी' पॅटर्न! अल्पवयीन गुन्हेगारांचा नंगानाच; आधी रिल तयार केलं, नंतर तरूणाला संपवलं

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सध्याचे सरकार हे गुन्हेगारांचे सरकार असल्याचा हल्लाबोल, शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे. ज्यामुळे बीड प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh Anil Gote
ST Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात भीषण अपघात, झाडामुळे एसटी बस धरणात पडता पडता वाचली; ७ प्रवासी जखमी

बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड यांना खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. इतर ७ जणांना देखील ताब्यात घेण्यात आलं. मात्र, एकाचा शोध पोलीस घेत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड, पुणे, धाराशिव इत्यादी शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चे निघालेत. मात्र, कोमात गेलेल्या सरकारवर काडीमात्र परिणाम झालेला नाही. इतके असंवेदनशील सरकार यापूर्वी देशात कुठेही सत्तेत आलेले नसेल, असं म्हणत अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर निशाणा साधलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com