Sant Sammelan News: राज्यात लवकरच संत संमेलन भरणार... देशभरातील ५ लाख साधूंचा सहभाग

Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज या मेळाव्यासंबंधीची बैठक होणर आहे.
Sant Sammelan News
Sant Sammelan NewsSaamtv
Published On: 

सुरज मासुरकर, प्रतिनिधी...

Sant Melava 2023: राज्यात लवकरच संत मेळावा (Sant Melava 2023) होणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यामध्ये ३ दिवसीय संत मेळावा भरणार असून देशभरातील साधू या मेळाव्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज या मेळाव्यासंबंधीची बैठक होणर आहे.

Sant Sammelan News
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' ला उच्च न्यायालयाचा दणका, आजपासून सभासदांना भेटणार : शाैमिका महाडिक (पाहा व्हिडिओ)

राज्यात लवकरच साधूंचा मेळावा...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारकडून लवकरच राज्यामध्ये संत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 5 लाख साधू संत यामध्ये सहभागी होणार असून तीन दिवस हा मेळावा असणार आहे. या मेळाव्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसून यासंबंधीची महत्वाची बैठक भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Sant Sammelan News
Chhatrapati Sambhajinagar: पाकिस्तानी तरुणाशी लग्न; ९ महिन्यांनी भारतात परतली अन्.. छत्रपती संभाजीनगरमधील महिलेचा ATS कडून शोध सुरू

बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक...

देशभरातून 40 साधू आणि महंत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. हरिद्वार (Haridwar), काशी (Kashi) अयोध्या (Ayodhya) आणि महाराष्ट्रातील संतासोबत चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत चर्चा करतील, ज्यानंतर या मेळाव्याची अंतिम तारिख निश्चित केली जाईल. या मेळाव्याच्या तारखेसह संपूर्ण रुपरेषा बैठकीतून ठरवली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com