Rane-Shivsena: राऊतांनी थोपटली नाशिक पोलीस आयुक्तांची पाठ

नारायण राणेंवर सर्वप्रथम आयुक्त दिपक पांडे (Deepak Pande) यांनी गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते
Rane-Shivsena: राऊतांनी थोपटली नाशिक पोलीस आयुक्तांची पाठ
Rane-Shivsena: राऊतांनी थोपटली नाशिक पोलीस आयुक्तांची पाठ Saam Tv news
Published On

अभिजीत सोनवणे

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नाशिक पोलीस आयुक्त (Nashik Police Commissioner) कार्यालयात आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांच्या कामाचं कौतुकही केलं. केंद्रिय मंत्री नारायण राणेंवर सर्वप्रथम आयुक्त दिपक पांडे (Deepak Pande) यांनी गुन्हा नोंदवून त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यांच्या या धाडसाचं कौतुक करत त्यांनी आयुक्तांची पाठ थोपटली.

हे देखील पहा-

वाचा, नक्की काय घडलं होतं त्या दिवशी?

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्वात प्रथम शिवसेनेचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या भावना दुखावल्याची तक्रार बडगुजर यांनी केली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर आधारे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना राणेंच्या अटकेचे आदेश दिले होते.

Rane-Shivsena: राऊतांनी थोपटली नाशिक पोलीस आयुक्तांची पाठ
'राणे अतिशहाणे'; संजय राऊतांचा वार

याबाबत स्वत दिपक पांडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे राणेंच्या अटकेच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिले होत. 'नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर उपराष्ट्रपतींना माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी, इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी यानांही सर्व माहिती दिली जाईल. घटनेनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर गुन्हागारी केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. पण बाकीच्यांना ,सदस्यांना अटक करता येऊ शकते. त्यामुळे 'फॅक्ट ऑफ द केस' पाहता राणेंच्या अटकेच्या आदेशाचा निर्णय घेतला आहे. कारवाईची गरज का वाटली याची संपूर्ण माहितीही संबंधित आदेशात दिपक पांडे यांनी दिली होती.

Edited By- Anuradhaa

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com