धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

Sanjay Raut Allegations On Omraje Nimbalkar Dharashiv Rally: धाराशिवमध्ये झालेल्या मेळाव्यात संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत 500 कोटींच्या प्लॉट व्यवहारासह पवनराजे हत्येवर संशय व्यक्त केला.
Sanjay Raut addresses a rally in Dharashiv, launching sharp allegations against Omraje Nimbalkar over corruption and past controversies.
Sanjay Raut addresses a rally in Dharashiv, launching sharp allegations against Omraje Nimbalkar over corruption and past controversies.saam tv
Published On

ऑपरेशन टायगरमध्ये 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्यानंतर उद्धव ठाकरे हे या प्रत्येक मतदारसंघात फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल करत आहे, तर सोबत खासदार संजय राऊत हे देखील आक्रमक झाले आहे. धारशिवमध्ये आयोजित ठाकरे गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. राऊत म्हणाले, धारशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरू झाले आहे आणि ते सक्सेस झालेय. गद्दार, भामटा आणि सोंगाड्या म्हणत त्यांनी ओमराजे यांच्यावर हल्लाबोल चढवला.

Sanjay Raut addresses a rally in Dharashiv, launching sharp allegations against Omraje Nimbalkar over corruption and past controversies.
Maharashtra Politics : ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटली! ६ खासदारांचा जय महाराष्ट्र, थेट धुडकावला व्हिप; दिल्लीतून सर्वात मोठी अपडेट

ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला

हा भामटा का गेला? त्याने प्रचंड भ्रष्टाचार केला ,आता मला असेही वाटत आहे की, त्याच्या वडिलांचा जो खून झाला आहे, त्यामागे देखील काहीतरी वेगळे रहस्य आहे, असे संजय राऊत म्हणाले. हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट या त्याच्या कंपनीने 500 कोटींचे प्लॉट आख्ख्या धारशिवमध्ये खरेदी केले. त्याची ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला आहे.

Sanjay Raut addresses a rally in Dharashiv, launching sharp allegations against Omraje Nimbalkar over corruption and past controversies.
Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

वडिलांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आहे. तेरणामधील भंगार विकून त्याने पैसा खाल्ला असे अनेक गुन्हे म्हणून या सगळ्यांची चौकशी लागली. म्हणून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून गेल्याचे राऊत म्हणाले. 15,20 वर्ष आम्ही एका सापाला दूध पाजले होते. पण त्याचा फणा ठेचायची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com