भूषण शिंदे
Sanjay Raut News: अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर १३ दिवस खातेवाटप रखडला होता. कारण शिंदे गटाचा अजित पवारांना अर्थ खाते देण्याला विरोध होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र तरीही अजित पवारांना अर्थ खाते मिळाले. याचदरम्यान, शिंदे सरकारच्या खातेवाटपावरून संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. (Latest Marthi News)
संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, 'शासन आपल्या दारी या उपक्रमात जनता त्यांच्या दारी जात नाही, त्यांना महत्व देत नाही. या कार्यक्रमात रेशन दुकानदारांना प्रत्येकी पन्नास माणसे आणायला सांगितले आहे. सभेसाठी माणसे आणली जातात, तसे जबरदस्तीने माणसे आणली जातात. जनता कुणाच्या दारात जाते हे लवकरच हे कळेल'.
'शिंदे गट आणि अजित पवार गट यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. अजितदादांची भूमिका आम्हाला मान्य नाही. भाजपची भूमिका आहे, वापरा आणि फेकून द्या. अजित पवार देखील फार काळ सरकारमध्ये राहणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला.
'अजित पवार यांना राष्ट्रवादी नको होती. आज जे बोलत आहेत त्यांचा नाईलाज आहे. त्यांना त्यांची धुणीभांडी करायची आहे, असे राऊत पुढे म्हणाले.
खातेवाटपावर भाष्य करताना राऊतांनी मोठा दावा केला. 'दिल्लीने सांगितले की अर्थ खाते तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रिपद अजितदादांना द्या, असं दिल्लीने सांगितलं. या गोष्टीवरून शिंदे मागे आले. ही माझी पक्की माहिती आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी दावा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, हे पाहावे लागेल. शिंदे गट संजय राऊत यांच्या दाव्याला काय प्रत्युत्तर देतो, हेही पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.