Sanjay Raut: अमित शाहांबाबत घेतलेल्या निर्णयाचा बाळासाहेबांना पश्चाताप झाला असता; संजय राऊतांकडून राजीनाम्याची मागणी

Sanjay Raut Slams Amit Shah: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या सुरक्षा धोरणांवर कठोर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Union Home Minister Amit Shah|Sanjay Raut
Union Home Minister Amit Shah|Sanjay RautSaamtv
Published On

मोदी सरकारच्या काळात पुलवामामध्ये ४० जवान शहीद झाले. तसेच नुकतंच पहलगाम हल्ल्यात २६ माता भगिनींचे कुंकू पुसले गेले. या व अशा अनेक घटना या काळात घडल्या. याच मुद्द्यांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागलं. 'गृहमंत्रालयाचे काम अपयशी ठरले आहे. अमित शाह हे खरंतर देशावर लादलेले गृहमंत्री आहेत', असं म्हणत राऊतांनी अमित शाहांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

ऑपरेशन सिंदूरवरून राऊतांनी सरकारवर टीका केली आहे, 'ऑपरेशन सिंदूर हे जवानांमुळे यशस्वी झाले आहे. यातही भाजप अपयश आहे. यानंतर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दिलेल्या धमकीमुळे माघार घेतली', असं संजय राऊत म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूर करण्याची गरज का भासली, याचा विचार करणं गरजेचं आहे. पहलगाम हल्ल्यात २६ महिलांचे कुंकू पुसले गेले. यात अमित शाह जबाबदार आहेत, त्यांनी प्रायश्चित म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेत त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं. कोणतीही जबाबदारी न स्वीकारणारे अमित शाह राज्यात येऊन ज्ञान पाजळतात', असंही राऊत म्हणाले.

Union Home Minister Amit Shah|Sanjay Raut
MNS Leader: मनसेच्या बड्या नेत्याचा मोठं घबाड उघडकीस, चार किलो गांजा अन्.. पोलिसांच्या कारवाईत आणखी काय सापडलं?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर, त्यांना अशा व्यक्तींना का वाचवले, याचा पश्चाताप झाला असता असं राऊत म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे जर असते तर, ते काय म्हणाले असते हे त्यांनी सांगायची गरज नाही. तडीपार अन् मर्डर केसमध्ये अडकलेल्या व्यक्तीला आपण वाचवले का? त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाला असता', असं राऊत म्हणाले.

हिंदूह्रदयसम्राटांची शिवसेना भाजपने स्वार्थासाठी फोडली, असा आरोप राऊतांनी केला, 'भाजपच्या बेईमानीला उद्धव ठाकरे शरण गेले नाही, खरंतर त्यांचा हा राग आहे. भाजपने आपल्या स्वार्थासाठी शिवसेना फोडली. यासाठी बाळासाहेबांनी त्यांना मिठी मारली असती का? हा बाळासाहेबांचा अपमान आहे आणि महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही', असं राऊतांनी ठणकावून सांगितलं.

Union Home Minister Amit Shah|Sanjay Raut
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला, धक्कादायक माहिती उघड; विचारही केला नसेल इतकं भयंकर

'भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊत म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर २६ जणांचे कुंकू पुसले गेले. याला तेच जबाबदार आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवादी गेले कुठे? गुजरातमध्ये पळाले की त्यांना दाहोदमध्ये लपवलं?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'ज्या दाहोदमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. तेथे जाऊन मोदींनी अनेक गर्जना केल्या आहेत, या घटनेला सरकारच जबाबदार आहेत', असा आरोप राऊतांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com