रत्नागिरीः : संजय राऊत (Sanjay Raut) हे 100 टक्के शरद पवार (Sharad Pawar) यांचा माणूस आहे. पगार सामानाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात. संजय राऊत शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे खासदार होतील अशी टीका भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. ते आज ते चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील तक्रारीवर निलेश राणे बोलत होते. फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच मविआ सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीस हे सर्वांना पुरून उरतील असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात असही राणे म्हणाले.
यावेळी राणे यांनी संजय राऊतांवरती देखील टीका केली, ते म्हणाले, संजय राऊत यांना किती सिरीयस घ्यायचं हे आता पत्रकारांनी ठरवायला हवं. संजय राऊत यांनी आजवर किती विषय तडीस नेले हे सांगावे. संजय राऊत हे 100% शरद पवार यांचा माणूस आहे. पगार सामानाचा घेतात आणि इमानी पवार साहेबांची करतात. संजय राऊत शिवसेना संपवून राष्ट्रवादीचे (NCP) खासदार होतील असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.