Sangli Robbery Updates: ज्वेलर्श शॉपवर सिनेस्टाईल दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचं वाहन सापडलं! पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलं?

Robbery at Jewelers Showroom : दरोड्यानंतर ज्या चार चाकी वाहनातून दरोडेखोर पसार झाले होते, ते वाहन सापडले आहे.
Sangli Robbery Updates
Sangli Robbery Updatessaam tv

Sangli Robbery at Jewelers Showroom : सांगलीत रिलायन्स ज्वेलरी या दुकानात दरोडा टाकून दरोडेखोरांनी रविवारी 14 कोटी रुपयांचा सोने-चांदी असा मुद्देमाल लंपास केला होता. या दरोड्यानंतर ज्या चार चाकी वाहनातून दरोडेखोर पसार झाले होते, ते वाहन सापडले आहे. भोसे वस्ती येथील संजय चव्हाण यांच्या शेताच्या बांधावर हे वाहन आढळून आले आहे.

या ठिकाणी मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, एलसीबी पथक आणि जिल्हयातील पोलीसांचा फौज फाटा दाखल झाला. या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दरोड्यासाठी वापरलेल्या दोन रिवाल्वर आणि दरोडेखोरांचे कपडे आढळून आले आहेत. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे देखील पोलिसांच्या हाती लागली आहेत.

Sangli Robbery Updates
Sulochana Latkar: 'सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद', मुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन

सांगली शहरातील सांगली मिरज रोडवर रिलायन्स या सोने चांदीच्या शोरूम वर सशस्त्र दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकून ज्वेलर्सला लुटल्याची घटना सांगलीमध्ये रविवारी घडली होती. सांगली-मिरज रोडवर रिलायन्स नावाचे सोने चांदीचे शोरूम या दरोडेखोरांनी लुटले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या दरम्यान दरोडेखोरांनी दुकानातील सर्वांना बांधून मॅनेजरला मारहाण केली, एका ग्राहकावर गोळीबार देखील केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात आठ ते दहा जणांनी ग्राहक बनून प्रवेश केला. यानंतर त्यांनी आतील कर्मचाऱ्यांना आपल्याकडील बंदूकीचा धाक दाखवत एका ठिकाणी थांबण्यास सांगितले. यानंतर चोरट्यांनी सर्वांचे हात बांधले आणि दुकानातील सर्व दागिने त्यांच्याकडील बॅगमध्ये भरण्यास सुरुवात केली. (Breaking News)

Sangli Robbery Updates
Wrestlers Protest Update: ती बातमी चुकीची! न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही, हटणारही नाही; साक्षी मलिकचं ट्वीट

यावेळी शोरुम मॅनेजरने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्यांनाही मारहाण केली. या सर्व घडामोडीत चोरट्यांनी अवघ्या काही वेळात शोरुममधील सर्व सोन्याचे दागिने लुटले. यावेळी एका ग्राहकांवरही या चोरट्यांनी गोळीबार केला, या घटनेत ग्राहक जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जाताना दरोडेखोर सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील सोबत घेऊन गेले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com