Sangli News: इस्लामपूरच्या पैलवानाची शाही थंडाई पोहोचली दुबईला

इस्लामपूरच्या पैलवानाची शाही थंडाई पोहोचली दुबईला
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : लाल मातीतील कसदार पैलवान होण्यासाठी मेहनती बरोबर 'खुराक' महत्वाचा आहे. अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी किताबा बरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा राखला. कुस्ती थांबल्यानंतर अनेक मल्ल खास करुन राजकारण व अन्य क्षेत्राकडे वळतात. मात्र सांगलीच्या (Sangli News) इस्लामपूरचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाबली केसरी पै. संग्रामसिंह जाधव या पैलवानाने उद्योगक्षेत्र निवडले. तेही कुस्तीक्षेत्राशी नाळ जपणारे. त्यांनी दीड वर्षापूर्वी 'शाही थंडाई'चा व्यवसाय सुरु केला. त्यांचा हा थंडाई व्यवसाय आता दुबईच्या (Dubai) शारजाह शहरामध्ये पोहोचला आहे. (Tajya Batmya)

Sangli News
Sambhaji Nagar: बायकोशी भांडण झालं, पतीनं विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्यानं प्रशासन हादरलं

मागील दोन वर्षाच्या पाठीमागे कोरोना आला होता. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन पडले. त्यामुळे त्याचा परिणाम कुस्तीवरही झाला होता. आणि कुस्तीमधले (Maharashtra Kesari) मल्ल कुस्तीविना घरी बसून राहिले. मैदाने होत नव्हती. त्यामुळे त्यांची उपजीविका चालायची कशी म्हणून जाधव यांनी थंडाई व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जाधव यांनी हा व्यवसाय चालू केला. पैलवानामध्ये निर्माण करण्यासाठी खुराक म्हणून अक्षरात दुधासह काजू, बदाम, पिस्ता अन्य ड्रायफ्रूटसह अंडी व मांस वापर करत असतात. त्याचबरोबर दूध व काजू बदाम, पिस्ता या पदार्थांपासून थंडाईची निर्मिती आपल्या घरात करून ते केंद्रात विक्री करत असतात.

Sangli News
Pune Crime News: बिर्याणी न दिल्याचा राग; हॉटेल चालकाला बेदम मारहाण

दुबईत २१० लिटरची विक्री

महाराष्ट्रात १३ आणि दुबे एक अशा १४ फ्रेंचाईची आज त्यांच्या नावावर आहेत. दुबईतही या थंडाईची क्रेझ निर्माण झाली असून २१० लिटर इस्लामपूरची शाही थंडाई दुबईत विक्री केली जाते. या शाही थंडाईचे स्टेटस काहींनी आपल्या व्हॉटस्‌ॲपवर ठेवत महाराष्ट्रातील मातीतील कुस्ती बरोबर थंडाईला वाहवा मिळवून दिली. जाधव यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कुस्त्या गाजवल्या आहेत. सध्या अवघे २७ वर्षाचे आहेत. तरुण वयातच त्यांनी ऐवढे मोठे यश मिळवले आहे. सध्या ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर बुकिंग करून थंडाई देणे सुरू आहे.

Sangli News
Nashik Crime News: सख्ख्या भावांचा किरकोळ वाद विकोपाला; वादात वडीलांनाही केली मारहाण

थंडाई पिल्याने शरीरातील थकवा नाहीसा होतो. व्यायाम केल्यानंतर थंडाई पिल्याने शरीर स्वस्थ होते. पचनक्रियेबरोबर पोट साफ होण्यास मदत होते. थंडाईमध्ये ‘ड’ जीवनसत्वाबरोबर प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स बरोबर शरीरास नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते. थंडाई ही पैलवान व खेळाडूंसाठी हे अमृत मानली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com