Sangli News: रस्त्यावर खेळ करत खेळाडूंनी केला निषेध; इस्लामपूरला क्रीडांगणाची मागणी

रस्त्यावर खेळ करत खेळाडूंनी केला निषेध; इस्लामपूरला क्रीडांगणाची मागणी
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On: 

सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील शासकीय क्रीडा संकुलाच्या लगतची जागा समाविष्ट करून शासकीय क्रीडा संकुल भव्य (Sangli) आणि सुसज्ज होण्याकरिता उपोषण सुरू करण्यात आले आहे. तर खेळाडूंनी रस्त्यावर खेळ करत अनोखा पध्दतीने निषेध करण्यात आला. (Tajya Batmya)

Sangli News
Beed News: लग्नामुळे आनंदाने भरलेले घर दुःखाच्‍या खाईत; एकुलत्या एक मुलाचे पंधरा दिवसांवर होते लग्‍न

इस्लामपूर (Islampur) ही क्रीडानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कबड्डी खो- खो, हॉलीबॉल, हॉकी यासारख्या खेळात अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. मात्र इस्लामपूरमध्ये मोठे शासकीय क्रीडांगण नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इथले खेळाडू क्रीडा क्षेत्रात यश मिळवत आहेत.

आजपासून आंदोलनाला सुरवात

क्रीडांगणाच्या मागणीसाठी आता खेळाडूंच्या सोबतच इस्लामपूरमधील विविध संघटना आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. आजपासून शहरात आंदोलन सुरू करण्यात आले असून उपोषण करण्यात येत आहे. लवकर मागणी मान्य नाही झाली; तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.