
बीड : एकुलत्या एक मुलाचे लग्न असल्याने घरात आनंदाने तयारी सुरू होती. नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण दिले गेले. पण नवरदेव असलेल्या धीरज वसंत तट याला हृदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला आणि यात उपचाराला घेवून जाताना त्याचा मृत्यू झाला. यामुळे लग्नामुळे आनंदाने भरलेले घर दुःखात बुडाले. (Maharashtra News)
बीडच्या (Beed News) अंबाजोगाई शहरात 26 वर्षीय युवकाचा हृदय विकाराने मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली. 18 तारखेला ज्याच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले; त्याच्याच अंत्यविधीसाठी यावे लागण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली. लग्नाच्या (Marriage) आनंदात असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात आपेगाव येथील तट कुटुंब वास्तव्यास आहे. स्थापत्य अभियंता असलेल्या धीरज वसंत तट या एकुलत्या एक मुलाचे लग्न जमले होते. लग्नाचा मुहूर्त 18 डिसेंबरला ठरला होता. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घरात लगीन घाई सुरू झाली. सर्वजण आनंदात होते. काही नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण पोचले होते. परंतु नियतीला काही औरच मान्य होत. धीरज यांना हृदय विकाराचा धक्का आला अन् यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळळा असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.