सांगली : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री विश्वजित कदम ट्रॅक्टरमधून बागेत पोहचले. अवकाळीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन मंत्री कदत यांनी यावेळी दिले. (sangli-news-Minister-vishwajeet-kadam-to-inspect-damage-from-tractor-Assurance-of-help)
सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः हा द्राक्ष आणि डाळिंब बागेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आज कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात नुकसानीचा पाहणी केली. यावेळी मिरज तालुक्यातील सोनी गावांत द्राक्ष बागेचे पाहणी करण्यासाठी रस्त्यात पाणी आणि चिखल असल्याने कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून द्राक्ष बागेवर पोहचले आणि पाहणी केली.
मुख्यमंत्रीसोबत बैठक घेऊन निर्णय
हवामान बदलामुळे डिसेंबर महिन्यात न भूतो असा अवकाळी पाऊस झाला आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. मात्र या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले. ते सांगलीमध्ये सोनी येथे बोलत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.