Solapur News: सांगलीत पोलिसांची मोठी कारवाई, दुचाकीतून तब्बल २ लाखांची रोकड जप्त

Sangli 2 Lakh Cash Seized: चडचण-विजापूरकडे एक व्यक्ती पैसे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली.
Solapur News: सांगलीत पोलिसांची मोठी कारवी, दुचाकीतून तब्बल २ लाखांची रोकड जप्त
Sangli Cash Seized
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गस्ती दरम्यान तेरामैल येथे एका दुचाकीस्वाराकडून १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. चडचण-विजापूरकडे एक व्यक्ती पैसे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तेरामैलच्या पुलाजवळ सापळा रचला आणि या पैशासह या व्यक्तीला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी सापळा रचला त्यावेळी संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून येताना दिसली. पोलिसांकडून त्याला थांबवण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जकीउल्ला अब्दुल कादर जमादार असे असल्याचे सांगितले. त्याच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता त्यात १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पैसे कुठून आले?, अशी विचारणा केली असता त्याने हे लग्नाचे पैसे असल्याचे सांगितले. पुढील तपास मंद्रूप पोलिस करत आहे.

तर दुसरीकडे पुण्यामध्ये निवडणूक आचारसंहितेच्या काळात १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहेत. एकाच खात्यावरून दोन हजार रुपये पेक्षा अधिक रक्कम अनेक खात्यावर गेल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ७५५ व्यवहार संशयाच्या भौवऱ्यात सापडले आहेत. जिल्हा बँक समितीकडून प्राप्तीकरला ही माहिती देण्यात आली आहे.

Solapur News: सांगलीत पोलिसांची मोठी कारवी, दुचाकीतून तब्बल २ लाखांची रोकड जप्त
Sangli Crime : सांगली हादरली! मूल होत नसल्याने महिलेवर पती आणि मांत्रिकासह तिघांकडून सामूहिक बलात्कार

संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळल्यास त्याबाबत अहवाल बँकांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे द्यावा असा आदेश देण्यात आला आहे. आरटीजीएस किंवा एनईएफटी मार्फत व्यवहार होत असल्यास त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उमेदवार त्याची पत्नी किंवा पती तसेच त्यांच्याशी संबंधित व्यक्तीने एक लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केली किंवा काढली असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

Solapur News: सांगलीत पोलिसांची मोठी कारवी, दुचाकीतून तब्बल २ लाखांची रोकड जप्त
Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com