MLA Shashikant
MLA Shashikant ShindeSaam TV News

फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, प्रांताध्यक्षांचा आदेश

Sangli Nationalist Party Worker Programme : जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादी पार पडला मेळावा.
Published on

सांगली : आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सांगलीत पार पडलेल्या पहिल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचं पक्षाकडून रिचार्ज करण्यात आलं. तसेच, राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या निमित्ताने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देखील पूर्णविराम मिळाल्याचं दिसून आलं.

मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी महत्वाची घोषणाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी केली आहे. सांगलीतून ज्याची सुरुवात होईल ती गुढी भविष्यात राज्यात उभारली जाईल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय शिवराय बोलायचं, असे म्हटले. आता येथून पुढे फोन लावल्यावर जय शिवराय बोलायचं, सुरुवात सांगलीतून होईल हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.

MLA Shashikant
Badlapur MIDC : बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारचा दणका, मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या...

जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादी पार पडला मेळावा. या मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. कोणताही फोन आला तर सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं, सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला आपण शाबूत ठेवला. परंतु, दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाभूत झाला आहे. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी हार मानली नाहीत. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असं आवाहनही शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

MLA Shashikant
Nashik Crime : आई म्हणाली बाहेर नको जाऊ; नाशकातल्या तरुणाच्या हत्येचं कारण समोर, वार झाल्याचं पोरानेच बापाला सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com