
नाशिक : नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोच्या शुभम पार्क भागातील चर्चसमोर १३ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने सुमित देवरे (वय २८) या तरुणावर हल्ला चढवून चॉपरने सपासप वार करत हत्या केली. ऐन होळीची लगबग सुरू असताना अचानकपणे रात्री झालेल्या या हत्येच्या घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं. या प्रकरणी अंबड पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
जुन्या भांडणातून हत्या
मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने देवरेचा काटा काढल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक राकेश हांडे यांचे पथकासह गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह व युनिट-२ चे पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
आई म्हणाली बाहेर नको जाऊ...
सुमित देवरे हा घरात असताना त्याला महत्त्वाचे काम असल्याचे सांगून संशयित आरोपींनी शुभम पार्कजवळील चर्चजवळ येण्यास भाग पाडलं. सुमितच्या आईने सुमित यास बाहेर जाऊ नको, असं सांगितलं होतं. मात्र, सुमित याने आईला मी लगेच जाऊन येतो असं समजावून सांगितलं आणि सुमितची ही भेट त्याच्या आईसाठी अखेरची ठरली.
वार झाल्याचं सुमितनेच वडिलांना कळवलं
संशयित आरोपींनी सुमितवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर त्यानेच वडिलांना फोन करुन माझ्यावर वार झाल्याचं सांगितलं. मात्र, हा सुमितचा शेवटचा फोन ठरला. सुमित हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. सुमितच्या जाण्याने कुटुंबियावर मोठा आघात झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.