Nashik Crime : काल कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा, आज ऐन सणासुदीच्या दिवशी तरुणाची हत्या; नाशिक हादरलं

Nashik CIDCO Youth Murder : होळीच्या दिवशी नाशकात युवकाची हत्या झालीय. शहरातील सिडको भागातील उत्तम नगर येथील शुभम पार्क, सेट जोसेफ चर्चच्या समोर ही धक्कादायक घडना घडली आहे.
CIDCO Shubham Park Sumit Deore youth murder
CIDCO Shubham Park Sumit Deore youth murderSaam Tv News
Published On

नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. बीडच्या मस्साजोग येथील दिवंगत सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. त्या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा काल नाशिकमध्ये दिसून आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे शहरातील पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्याचदरम्यान, आज ऐन सणासुदीच्या दिवशी नाशकात एका तरुणाची हत्या झाली आहे. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

होळीच्या दिवशी नाशकात तरुणाची हत्या झालीय. शहरातील सिडको भागातील उत्तम नगर येथील शुभम पार्क, सेट जोसेफ चर्चच्या समोर ही धक्कादायक घडना घडली आहे. सुमित देवरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हत्या करून संशयित आरोपी मात्र घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झाले आहेत, पुढील तपास ते करत आहेत.

CIDCO Shubham Park Sumit Deore youth murder
Exam Answer Sheet : बारावीच्या उत्तपत्रिका जळून खाक, विद्यार्थ्यांचं भवितव्य राख; शिक्षिकेचा हलगर्जीपणा नडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com