
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कोट्यावधी रुपयांची थकबाकी असलेल्या ६० कर्जदारांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मार्च एंड जवळ येत असल्याने आणि एनपीए कमी करण्याच्या उद्देशाने बँकेकडून ही विशेष मोहिम राबवली जात आहे.
यामध्ये, घरबांधणी, व्यवसाय, शेती कर्ज अशा प्रकारच्या मुदतीच्या कर्जाचे हफ्ते थकल्याने ६० कर्जदारांना ८ कोटी ३५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे.
या यादीत काही माजी बँक कर्मचारी, सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यावसायिक यांचा समावेश आहे. शेती कर्जाची नियमित वसुली केली जात असली तरी बिगरशेती कारणांसाठी दिलेले कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहे. बँकेने घर बांधण्यासाठी व इतर कारणांसाठी वैयक्तिक कर्ज दिले होते.
तब्बल ८ कोटी ३५ लाख रुपये थकीत आहेत, त्यामुळे बँकेने थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे. जर मुदतीत त्यांनी थकबाकी भरली नाही, तर सरफेसी कायद्यांतर्गत त्यांच्या मालमत्तेची विक्री करून वसुली करण्यात येणार आहे. बँकेचा हा आक्रमक पवित्रा पाहता थकबाकीदारांसाठी मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.