Sanganak Parichalak: मंत्र्यांनी १५ दिवसात अहवाल मागितला आज १५५ दिवस झाले तरीही...., अखेर संगणक परिचालकांनी उपसले काम बंद आंदाेलनाचे हत्यार

बुहतांश आंदाेलक हे १२ वर्षापासुन ग्रामपंचायत कार्यलयांमध्ये संगणक परिचालक म्हणून काम पाहत आहेत.
sanganak parichalak sanghtana kaam bandh andolan
sanganak parichalak sanghtana kaam bandh andolansaam tv
Published On

- अक्षय गुंड

Solapur News :

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आमच्या मागण्यांबाबत ताेडगा काढण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लेखी आश्वासन दिले. आज १५५ दिवस झाले तरी मागण्यांच्या पुर्तता झाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव काम बंद आंदाेलन छेडल्याचे संगणक परिचालकांनी नमूद केले. दरम्यान राज्यभर संगणक परिचालकांचे काम बंद आंदाेलन सुरु असल्याने खेडापाड्यातील संगणकावरील सर्व कामे ठप्प झाली आहेत. (Maharashtra News)

sanganak parichalak sanghtana kaam bandh andolan
Bhogawati Sahakari Sakhar Karkhana Election Result : काेल्हापुरातील केंद्रावर गाेंधळ, 'भोगावती'ची मतमोजणी थांबली

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने शुक्रवारपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीत संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती द्यावी तसेच किमान वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी हे आंदाेलन छेडण्यात आले आहे.

बुहतांश आंदाेलक हे १२ वर्षापासुन ग्रामपंचायत कार्यलयांमध्ये संगणक परिचालक, नागरिकांना ऑनलाईन व ऑफलाईन प्रकारच्या सेवा तसेच ग्रामपंचायत अंतर्गत कामे करत आहेत. त्यांना ६ हजार ९३० रुपये असे मानधन दिले जाते. हे मानधन तुटपुंजे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर ता.११ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार फाईल वित्त विभागात गेल्यानंतर त्यात काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडून १५ दिवसात अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु १५५ दिवस झाले तरी, अद्याप अनेक जिल्हा परिषदांनी सदरील अभिप्राय न दिल्यानं शासन आणि प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे काम बंद आंदाेलन छेडल्याची माहिती आंदाेलकांनी दिली.

sanganak parichalak sanghtana kaam bandh andolan
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त 30 नाेव्हेंबरपर्यंत घेता येणार विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन

संगणक परिचालकांच्या मागण्या

ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून, संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देणे. व निर्णय होईपर्यंत २० हजार रुपये मासिक मानधन द्यावे.

नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करावी.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देणे, व नवीन नियुक्ती झाली आहे त्यांना मागील सात महिन्यापासून मानधन मिळाले नाही, त्यांना त्वरित मानधन अदा करणे.

Edited By : Siddharth Latkar

sanganak parichalak sanghtana kaam bandh andolan
Nitesh Rane On Narendra Modi Stadium: नरेंद्र माेदी स्टेडियमवर काॅंग्रेसने रचलं हाेते षडयंत्र, नितेश राणेंचा दावा; विराटचा दिला दाखला....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com