Sangli Crime News: मोठा अनर्थ टळला! बायकोला संपवण्यासाठी त्याने पिस्तूल खरेदी केले अन्... सांगलीत खळबळ

Sangli Latest News: बायकोचा खून करून मी पोलिसात हजर होणार होतो अशी कबुली आरोपीने दिली आहे.
Sangli News
Sangli NewsSaam TV
Published On: 

Sangli Crime News: अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बायकोचा खून करण्यासाठी पिस्तूल घेऊन निघालेल्या संशयितास महात्मा गांधी पोलिसांनी अटक केली आहे. या संशयिताकडून एक गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. सचिन बाबासाहेब रायमाने रा. चिक्कोडी असे या संशयिताचे नाव आहे. या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Sangli News
Ashadhi Wari 2023: यळकोट यळकोट; जय मल्हार! भंडाऱ्याची उधळण करत माऊलींची पालखी जेजुरीत दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित रायमाणे हा चिकोडी कर्नाटक येथील रहिवाशी असून त्याच्या बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला नेहमी संशय होता. यातूनच बायकोचा खून करायचा या उद्देशाने संशयित याने चिकोडीमधून कुपवाड येथे येऊन तेथून एक पिस्टल आणि काडतूस खरेदी केले. यानंतर तो चिकोडीकडे बायकोचा खून करण्यासाठी निघाल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी लामदाडे याना माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने मिरज रेल्वे स्टेशन समोरील एका हॉटेल समोरून ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि 1 काडतूस आढळून आले. (Crime News)

Sangli News
Sharad Pawar News: गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या... 'या' बड्या नेत्याचे रोहित पवारांना पत्र

यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता आपल्या बायकोचा खून करण्यासाठीच पिस्तूल खरेदी केल्याची कबुली त्याने दिली. तसेच बायकोचे अनैतिक संबंध असून तिचा खून करून मी पोलिसात हजर होणार होतो असेही सांगितले.

त्यानुसार रायमाने यांच्यावर अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. संशयिताने हे पिस्तूल कुपवाड इथून एका व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सांगितले असून पोलीस त्याच्या शोधत आहेत. महात्मा गांधी पोलिसांच्या या कारवाईमुळे एका महिलेचा खून होता होता वाचवण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.