महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता!

मंत्री संदिपान भुमरे यांच्याविरुद्ध पैठणमधील शासकीय जमीन हडपल्याप्रकरणी, गुन्हा नोंदवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.
Sandipan Bhumare
Sandipan Bhumare SaamTvNews
Published On: 

औरंगाबाद : महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्याविरुद्ध पैठणमधील शासकीय जमीन हडपल्याप्रकरणी, गुन्हा नोंदवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. याप्रकरणी प्रतिवादी राज्य शासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचं तक्रारकर्ते दत्तात्रय गोर्डे यांनी सांगितले.

हे देखील पाहा :

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे दत्तात्रय राधाकिशन गोर्डे यांनी याचिका दाखल केली आहे. राज्याचे रोहियो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा जिल्हा परिषदेत सदस्य असलेल्या विलास भुमरे मुलाने शासकीय जमिनीवर घरकुल योजनेसाठी बेकायदा भूखंड लाटत तीस कोटींची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली त्यांनतर न्यायालयाने हे आदेश दिले असल्याचा दावा गोर्डे यांनी केला आहे. पैठण (Paithan) येथे पत्रकार परिषद घेत गोर्डे यांनी ही माहिती दिली आहे.

Sandipan Bhumare
वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात; चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या!

गोर्डे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, मंत्री संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांनी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून तसेच आपल्या पदाचा गैरवापर करत कोट्यवधी रुपायांची शासकीय लाटली आहे. याबाबत आपण औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक, लाचलुचपत विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. तसेच पोलिस अधिक्षक (ग्रामिण),पैठण उपविभाग व पोलिस स्टेशन पैठण यांच्याकडे यापुर्वी तक्रारी अर्ज दाखल केला होता. परंतु माझ्या तक्रारी अर्जांचा कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही.

Sandipan Bhumare
Pune : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात टोळीयुद्धाचा भडका!

त्यामुळे मी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी याचिका क्र.१०६२/२०२१ दाखल केली होती. तर सदरील याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने दिनांक ०८/०२/२०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पैठण पोलीस उपविभाग कार्यालय व पोलिस स्टेशन पैठण कार्यालयात तक्रार दाखल सांगितले असल्याचं गोर्डे यांनी म्हटले आहे.

Sandipan Bhumare
बीडमध्ये गाईच्या वासराला खाल्ल्यानंतर चक्क बिबट्याचा मृत्यू!

काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांनी केलेल्या आरोपानुसार, संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांनी पैठण शहरातील महत्त्वाच्या जागी बेकायदा कब्जा केल्याचा आरोप करण्यात आला. पैठणच्या मुख्य जागी सहा हजार चौरस मीटर इतकी ही जागा असून या जागेची किंमत तीस कोटी रुपये इतकी झाली आहे. सिटी सर्वे क्रमांक 1026 ही जमीन नगर परिषद पैठण हद्दीमध्ये असून, ही जमीन महाराष्ट्र शासनाची आहे.

Sandipan Bhumare
Mumbai : शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार नकोत; हायकोर्टात याचिका

तर, सदर जमिनीचे पीआर कार्डमध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव मालकी रकानामध्ये नमूद केलेले आहे. मात्र असे असताना सुद्धा फक्त राजकीय दबावापोटी संदिपान भुमरे आणि त्यांच्या मुलाने ही जागा शासनाच्या मालकीची असताना देखील नोटरी करून 99 वर्षांच्या करारावर जमीन हस्तांतरित केली दत्ता गोर्डे यांनी केला होता. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com