

मुंबई : शिवाजी पार्क (Shivaji Park) हे खेळाचे मैदानच राहावे तेथे वेगवेगळ्या थोर व्यक्तींची स्मारके किंवा अंत्यसंस्कार करू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे कि, शिवाजी पार्क या मैदानला एक वेगळा इतिहास आहे.
हे देखील पहा :
शिवाजी पार्क हे खेळाचे मैदानच राहावे हीच याचिकेतील प्रमुख मागणी, शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावरही शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे स्मृतिस्थळ ही त्या ठिकाणी उभारण्यात आले. नुकतेच शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आता त्यांच्या स्मृतिस्थळ किंवा स्मारकाची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत या दोघांचेही योगदान हे मोठं आहे. मात्र, मुंबईत (Mumbai) सध्या शिवाजी पार्क हे एकमेव मोठं खेळाचं मैदान असून त्याचाही विचार करायला हवा. असे शिवाजी पार्कचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बेलवडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) म्हटले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.