समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर हा भलामोठा खड्डा पडला आहे. समृद्धी महामार्गावरून गावांमध्ये जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या ब्रीजवर हे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते आणि पूल तयार करण्यात आले आहे. मात्र याच पूलाला भगदाड पडल्याचे दिसून आले आहे. शेरेगाव जवळील पूलावर हे भगदाड पडले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आणि काही ना काही घटना घडत असल्यामुळे समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा समोर आला आहे. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे - बावघर - शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेल्या पूलावर मोठे भगदाड पडले आहे. या घटनेमुळे वाहतूक बंद करण्यात आली होती.
समृद्धी महामार्गावर बनवण्यात आलेल्या पुलावरून गावागावात जाण्यासाठी वाहतूक अद्याप सुरू केली नाही. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच महामार्गाची पडझड सुरू झाली आहे. महामार्ग सुरू झाला तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
दरम्यान, नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन अवघं एक वर्ष झालं आहे. या महामार्गावर भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील माळईवाडा इंटरचेंजजवळ महामार्गावर भेगा पडल्या आहेत. ३ सेंटी मीटर रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरण्यात आले आहे. त्यामुळे २० वर्षे खड्डे पडत नाही, असा दावा एमएसआरडीसीने केला होता. पण त्यांनी केलेला दावा आता फेल ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.