Samruddhi Highway: मोठी बातमी! वर्षभरातच समृद्धी महामार्गाला पडल्या भेगा, अपघाताचा धोका वाढला

Chhatrapati Sambhajinagar Breaking News Cracks in Samruddhi Highway: समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याची मोठी बातमी समोर आलीय. यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 समृद्धी महामार्ग
Samruddhi HighwaySaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून नेहमीच चर्चत आहे. आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडालीय. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं एक वर्ष झालंय, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्याचं समोर आलंय.

वर्षभरातच समृद्धी महामार्गाला पडल्या भेगा

महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नाही, असा दावा एमएसआरडीसीने केला होता, मात्र आता तो फोल ठरला असल्याचं दिसतंय. एमएसआरडीसीचे अधिकारी मात्र यावर बोलण्यास तयार (Chhatrapati Sambhajinagar) नाहीत. माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. महामार्गावर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे चालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

अपघात होण्याची शक्यता

समृद्धी महामार्गाकडे महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून पाहिलं जातं. मात्र, या महामार्गाचे उद्घाटन होऊन अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही. समृद्धी महामार्ग अजून मुंबईपर्यंत सुरू झाला नाहीये. तरीही महामार्गावर भेगा पडल्याचं धक्कादायक वृत्त समोर (Cracks in Samruddhi Highway) आलंय. माळीवाडा एक्सचेंजजवळ हा प्रकार समोर आलाय. येथील स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केल्याची माहिती मिळतेय. परंतु अजून याची दखल घेतली गेलेली नाहीये.

 समृद्धी महामार्ग
Samruddhi Mahamarg Route: मुंबई ते नाशिक प्रवास एका तासाने कमी होणार; 'समृद्धी'चा आणखी एक टप्पा खुला होणार, वाचा डिटेल्स

समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह

समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी लांबीचा (Samruddhi Highway News) आहे. त्यापैकी ६२५ किमी लांबीचा मार्ग सध्या वाहतुकीसाठी खुला आहे. समृद्धी महामार्गाचे उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मिळतेय. ऑगस्ट महिन्यापर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. समृद्ध महामार्गामुळे वेळेत प्रचंड बचत होते. परंतु भेगा पडल्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह (Samruddhi Highway Accident) निर्माण होत आहे.

 समृद्धी महामार्ग
Samrudhhi Mahamarg: समृद्धीवर आठवडाभरापासून वाहनधारकांचा मोफत प्रवास; काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com