Samrudhhi Mahamarg: समृद्धीवर आठवडाभरापासून वाहनधारकांचा मोफत प्रवास; काय आहे कारण?

Samrudhhi Mahamarg Free Travel: समृद्धी महामार्गावर आठवडाभरापासून वाहनधारकांचा मोफत प्रवास सुरू असल्याचं समोर आलं आहे. समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी संपाचा हा परिणाम आहे.
Samrudhhi Mahamarg
Samrudhhi MahamargYandex

रामनाथ ढाकणे

Toll Worker Protest Samrudhhi Mahamarg

समृद्धी महामार्ग कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चत असतो. आता महामार्गावर आठवडाभरापासून वाहनधारकांचा मोफत प्रवास सुरु असल्याचं समोर आलं (Samrudhhi Mahamarg Free Travel) आहे. नेमकं कोणत्या कारणामुळं ते मोफत प्रवास करत आहेत, हे आपण जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी 5 मार्चपासून संप पुकारला (Toll Worker Protest Samrudhhi Mahamarg) आहे. त्यांनी वेतनासाठी बेमुदत संप पुकारल्याची माहिती मिळतेय. पण टोलवरील कर्मचाऱ्यांच्या संपाचा वाहनधारक चांगलाच फायदा घेत आहेत. चक्क समृद्धी महामार्गावरून गेल्या आठवडाभरापासून ते मोफत प्रवास करत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा संप

समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील (Jambargaon Toll) कर्मचाऱ्यांना काही महिन्यापासून दरमहा वेतन मिळत नाही. तसंच पीएफचा लाभ आणि पगार स्लीप देण्यात यावी, या मागण्यांसाठी हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले ( Samrudhhi Highway) आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या जांबरगाव टोल नाक्यावर कर्मचारी नाहीत, याचा फायदा वाहनधारकांनी घेतला आहे. आठवडाभरापासून वाहनधारक सुसाट वेगाने समृद्धीवरून मोफत प्रवास करताना दिसत आहे.

समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावरील कर्मचारी ५ मार्चपासून संपावर गेले आहेत. आपल्या मागण्यांसाठी अनेकदा या कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली. मात्र, टोल कंपनीनं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष (Toll Worker Protest Samrudhhi Mahamarg) केलं. त्यामुळे समृद्धी महामार्गावर येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांची नोंद घेण्याचं काम ठप्प झालं आहे. याचा वाहनधारकांना मोठा फायदा होत आहे.

Samrudhhi Mahamarg
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघात होणार कमी; वाहतूक विभागाचा मास्टरप्लान आला समोर

समृद्धी महामार्गावरील वेगावर नियंत्रण

समृद्धी महामार्गावर दर दहा किमीवर वाहनांचा वेग मोजणारं यंत्र बसविण्यात येणार (Speedometers On Samruddhi Mahamarg) आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर महामार्गावर वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा उभारली जात आहे.

यामुळे आता बेशिस्त वाहनचालकांवर वचक बसण्यास मदत मिळणार आहे. भरधाव वाहनांवर दंडात्मक कारवाई करणं शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासाठी १ हजार ४९८ कोटी रुपये खर्च करणार (Samruddhi Mahamarg Accident) आहे. महामार्गावर इंटिलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) बसविण्यात येत आहे. समद्धी महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.

Samrudhhi Mahamarg
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com