Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात होणार नाहीत? २४ तास गस्तीसह पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Samruddhi Mahamarg Accident: याच संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On: 

संजय जाधव

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर पोलीस विभाग खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आलं आहे. गेल्या आठवड्यापासून विविध उपाययोजना करण्यासंदर्भात बैठका घेऊन त्या प्रत्यक्षात देखील उतरवल्या जात आहेत. याच संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ प्रवाशांचे बळी घेणाऱ्या ट्रॅव्हल्स अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पुढील महिन्यात न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील समृद्धी मार्गावरील (Samruddhi Expressway) अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाहणी अंती निर्देश दिले होते, त्यानुसार ८७ किलोमीटर अंतरात ४ वाहनाद्वारे २४ तास पोलिसांकडून गस्त घालण्याचे नियोजन सुरू आहे.

Samruddhi Mahamarg
Kenya Road Accident: भरधाव ट्रकने पादचाऱ्यांना चिरडलं; ४८ जणांचा जागीच मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला अपघाताचा थरार

सध्या २ वाहनाद्वारे गस्त घालण्यात येत आहे. या वाहनांमध्ये समन्वय रहावा यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मेहकर इंटरचेंजवर ही यंत्रणा सुरू झाली असून त्याला एक वेगळे 'चॅनेल' देण्यात आल्याचे महामुनी म्हणाले, महामार्गावर विविध रंगी झेंडे, मार्गदर्शनपर फलक, बोर्ड लावण्यात येत आहेत.

दुसरीकडे राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने महामार्गावर 'रंबल स्ट्रीप' तर पुलावर 'क्रश बॅरिअर' लावण्याचे काम अंतिम टप्पात आहे. येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलंय. वाहने जिल्हा हद्दीत ज्या ठिकाणी प्रवेश करतात त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, दुभाजकाला धडकून कारचा चुराडा

आग विझविण्यासाठी 'फोम डेपो' कार्यान्वित करण्यात येणार असून जास्तीत जास्त 'रिफ्रेशमेन्ट' केंद्र सुरू करण्यासाठी महामंडळाला सूचित करण्यात आल्याची माहिती बुलढाण्याचे (Buldhana) अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.