Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर मिनी ट्रॅव्हल्स ट्रकची धडक, एकाचा मृत्यू

Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चॅनल क्रमांक 224 जवळ हा अपघात झाला.
Samruddhi Highway
Samruddhi HighwaySaam TV
Published On: 

Washim News :

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. वाशिमजवळ आज समृद्धी महामार्गावर मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीच मृ्त्यू झाला आहे, तर एक जखमी आहे.

समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चॅनल क्रमांक 224 जवळ हा अपघात झाला. एक मिनी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी महामर्गावरुन वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत एक ठार झाला आहे. (Latest Marathi News)

Samruddhi Highway
Wardha Accident : खड्ड्याने केला घात; हिंगणघाटात ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

प्रवीण राजकुमार छत्री (वय 29 ) याचा जागेवर मुत्यू झाला आहे. तर ट्रक चालक मगबुल अली (वय 23) किरकोळ जखमी आहे. दरम्यान ट्रॅव्हल्सचा टायर बदलण्याचं काम सुरु असताना हा अपघात झाला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले असल्याने मोठी दुर्घटना टळली.

Samruddhi Highway
Belapur-Panvel Harbour Line: ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलसेवा पुन्हा विस्कळीत, फक्त ठाणे ते बेलापूर लोकल धावणार; प्रवाशांचे हाल

समृद्धी महामार्गावरील वाहतूक ५ दिवसांसाठी बंद

समृद्धी महामार्गावरील वाहतूक ५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. जालना इंटरचेंज ते सावंगी मार्गातील टॉवरचे काम सुरू असल्याने १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३.३० या वेळेत महामार्ग वाहतूकीसाठी बंद असेल. या वेळेत समृद्धी महामार्गावरुन कोणतीही वाहतूक होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.