

>> चेतन व्यास/गोपाल मोटघरे, साम टीव्ही
Samruddhi Mahamarg Accident At Buldhana: बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथे मध्यरात्री झालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात एखा दोन वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. ओवी परिणीत वनकर असं या चिमुकलीचं नाव आहे. विशेष म्हणजे वनकर दाम्पत्याने या चिमुकलीला दोन वर्षापूर्वी दत्तक घेतलं होतं. या अपघातात चिमुकल्या ओवीसह आई वृषाली परिणीत वनकर आणि तिची आजी शोभा विनायक वनकर यांचा देखील मृत्यू झाला.
वनकर कुटुंबीय चंद्रपूर येथील रहिवाशी आहे. परिणीत यांना पुण्यात नोकरी लागल्याने ते कुटुंबासह पुणे येथे स्थायिक झाले. परिणीत आणि वृषाली यांचं १५ वर्षांपूर्वी लग्न झालं. मात्र, वैवाहिक जिवनात अपत्य प्राप्ती झाली नसल्याने त्यांनी त्यांच्या मित्राकडून मुलगी दत्तक घेतली. (Breaking News)
जन्मापासून वृषालीने ओवीचा प्रेमाणे सांभाळ केला. २८ जून रोजी परिणीत वनकर, त्याची आई शोभा वनकर, पत्नी वृषाली आणि मुलगी ओवी हे कारने पुण्यावरून वर्धा येथे आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून त्याच दिवशी परिणीत अर्जंट काम असल्याने कारने परत पुण्याला निघून गेले. त्यांची पत्नी, आई आणि मुलगी तिथेच थांबले होते. (Marathi Tajya Batmya)
लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ३० जून रोजी सायंकाळी सावंगी येथील बायबासवरून वृषाली, शोभा आणि ओवी या तिघी ट्रॅव्हल्समध्ये बसल्या. दरम्यान सिंदखेड राजा परिसरात समृद्धी महामार्गावर मध्यरात्री त्याच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यात परिणीत यांच्या पत्नी वृषालीसह मुलगी ओवी आणि आई शोभा यांचा होरपळून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिणीत आणि त्यांच्या नातेवाईकांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.