Pune : पुण्याहून वाशिमला निघाले, समृद्धीवर काळाने घाला घातला, दोघांचा जागीच मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक

Samruddhi Mahamarg Accident : पुण्याहून वाशिमकडे जाणारी कार मेहकरजवळ ट्रकला धडकली. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. कारचा पुढील भाग पूर्ण चुरडला झाला.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident
Published On

Samruddhi Mahamarg Latest News Update : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झालाय. पहाटे चालकाचा डोळा चुकल्यामुळे मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात जाल्याचे समजतेय. पुण्याकडून कार वाशिमकडे चालली होती, त्यावेळी पहाटे हा अपघात झाला.अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर चेनेज २६८ येथे पहाटे पाच वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. पुण्याहून वाशिमकडे जाणारी एक भरधाव कार समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना जरा सावधान! वाहनचालक, प्रवाशांच्या पोटात गोळा

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकरजवळ कारचालकाला पाहटे अचानक डोळा लागला, त्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि समोर जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली. या धडकेनंतर कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिघा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Toll: समृद्धी महामार्गावर 'टोल'धाड, ट्रकसाठी १००० तर कारसाठी २०० रुपये वाढ; नवे दर काय?

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी कार आणि ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com