Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना जरा सावधान! वाहनचालक, प्रवाशांच्या पोटात गोळा

Samruddhi Expressway Safety : समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना जरा सावध राहा. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसरबीडजवळील पुलावरील लोखंडी अँगल तुटून उघडा पडल्याने अनेक वाहनांचे टायर फुटले. तर काही वाहनांना अपघात झाले.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालक आणि प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा येतोय. कारणही तसंच आहे. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसरबीडजवळील पुलावरील लोखंडी अँगल तुटून उघडा पडल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटले आणि अपघात झाले. तर अनेक वाहनांचे यामध्ये नुकसान झाले. प्रवाशांनी अॅम्ब्युलन्स आणि इतर मदत मागूनही मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, लोखंडी अँगल तुटून वर आल्याने अनेक गाड्या यावेळी महामार्गावर अडकून पडल्या होत्या. अनेक वाहनांचे टायर फुटल्याने वाहने रस्त्यात अडकून पडल्याने त्यांना लवकर मदत मिळाली नव्हती. काही वेळानंतर समृद्धी महामार्गावर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी वाहतूक कोंडी सोडवली. तरीही या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकसानग्रस्त वाहने टोलनाक्यावर उभी करून प्रवाशांनी पुढचा प्रवास सुरू केला. तर काहींना तिथेच थांबावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com